Farmagudi News Dainik Gomantak
गोवा

Farmagudi News: फोंडा परिसरात पावसाने उडवली दाणादाण; फर्मागुडी येथे कारवर कोसळले झाड

जीवितहानी टळली; अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती

Akshay Nirmale

Farmagudi News: शुक्रवारी पावसाने फोंडा तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाने दाणादाण उडवल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील सखल भागात पाणी साचले आहे. नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले आहेत.

फर्मागुडी येथे पार्किंगमधील एका कारवर गुलमोहराचे झाड कोसळले. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या वेळी गाडीत किंवा या परिसरात कुणी नव्हते त्यामुळे जीवीतहानी झालेली नाही.

ही माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे झाड हटवून हा परिसर मोकळा केला आहे. या घटनेत गाडीचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. इतरही अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाकडे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT