Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाची शक्यता; सहा दिवस यलो अलर्ट

Goa Monsoon 2025: गेल्या २४ तासांत राज्यात धारबांदोडा येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. तर पेडणे ते काणकोणपर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाची शक्यता असून, गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात सहा दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह राज्यात मुसळधार सरी बरसतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २५ ते ३० जून या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील तीन तास महत्वाचे

हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण आणि उत्तर गोव्यात आज (२४ जून) पुढील तीन तास मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याकाळात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तिसवाडी, फोंडा, मुरगाव आणि सासष्टी तालुक्यावर काळे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. इतर तालुक्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत धारबांदोडात मुसळधार

गेल्या २४ तासांत धारबांदोड्यात मुसळधार पावसाची (७६.१mm) नोंद झाली आहे. सांगे, केपे, फोंडा, साखळी, दाबोळी, काणकोण, ओल्ड गोवा, पणजी, मडगाव, मुरगाव आणि पेडण्यात (११.६ ते ६४.४ mm) दरम्यान पावसाची नोंद झाली. तर, म्हापशात सर्वात कमी ७ mm पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT