Goa Monsoon 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2025: गोव्यात गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा; आठवडाभर राहणार पाऊस

Goa Weather Update: हवामान खात्याने गोव्यात आज (११ जून) वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

पणजी: मे महिन्याच्या अखेरीस राज्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने जूनपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पाऊस पुन्हा दमदार एन्ट्री करण्याची शक्यता असून, हवामान विभागाच्या गोवा वेधशाळेने राज्यात गुरुवारी (१२ जून) रेड अलर्ट तर शुक्रवारी (१३ जून) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात आठवडाभर पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

 गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी (११ जून) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी रेड आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १४ ते १७ जून या काळात राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता आहे.

या काळात राज्यात वादळी वाऱ्यासह, वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज असून, ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील १ ते ३ तास वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याने गोव्यात आज (११ जून) वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याकाळात वादळासह ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

गोव्यासह महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस सक्रिय झालेल्या पावसाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून विश्रांती घेतली आहे. पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, हवामान खात्याने गोव्यासह कोकण तसेच, पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT