पणजी: राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा सर्वसामान्यपणे मान्सून कालावधी मानला जातो या कालावधीत यंदा एकूण ३१३५ मिमी म्हणजेच १२३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक १६१.९४ इंच इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद धारबांदोडा तालुक्यात झाली आहे, तर सर्वात कमी ८४.१४ इंच पाऊस मुरगाव येथे नोंदला आहे.
सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा ४.२ टक्के पाऊस पडला असून उत्तर गोव्यात १२१.४१ इंच तर दक्षिण गोव्यात १२५.२२ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून कालावधीत १७३ इंच पावसाची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षी राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पाऊस नोंदविण्यात आला.
यंदा राज्यात चार दिवस पाऊस तर चार दिवस विश्रांती अशा स्वरूपात बरसला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पडझड,मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटना अतिशय कमी प्रमाणात नोंदविण्यात आल्या. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्टही काही मोजक्याच दिवशी देण्यात आले. यंदा एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस २ जुलै रोजी नोंदविण्यात आला.
या दिवशी १६०.९ मिमी म्हणजेच ६.३३ इंच पावसाची नोंद करण्यात आली तर त्या खालोखाल २७ ऑगस्ट रोजी १५९.९ मिमी म्हणजेच ६.२९ इंच आणि तिसऱ्या क्रमांकावर १८ ऑगस्ट रोजी ४.१३ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
- गंगाराम आवणे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.