75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेशी केले लग्न; पहिल्या रात्रीनंतर नवऱ्याचा झाला मृत्यू

Uttar Pradesh News: उतारवय असल्याने सोबती असावे म्हणून त्यांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
Elderly man dies after wedding night
75 year old man marriage newsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश: 75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेशी विवाह केला पण, लग्नाच्या पहिला रात्रीनंतर सकाळी त्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जौनपूर जिल्ह्यातील कुचमूच गावात ही घटना घडली. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर वृद्धाने दुसरे लग्न केले होते.

संगरुराम (७५) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव होते. उतारवय असल्याने सोबती असावे म्हणून त्यांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संगरुराम यांना कोणतेही मुलबाळ नव्हते तसेच, शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. नातेवाईकांनी त्यांना दुसरे लग्न न करण्याचा सल्ला दिला होता पण, त्यांनी या न जुमानता दुसरे लग्न केले होते.

सोमवारी (२९ सप्टेंबर) रोजी त्यांनी जलालपूर येथील मानभावती (३५) या महिलेशी विवाह केला. दाम्पत्याने कोर्ट मॅरेज करुन एका मंदिरात सर्व रितीरिवाज पार पाडले होते. पतीने सुखात ठेवण्याचे वचन दिले असून, तो संसाराची जबाबदारी उचलण्यास तयार असल्याचे महिलेने लग्नावेळी सांगितले होते. यानंतरच तिने लग्नास होकारही दिला होता.

दरम्यान, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संगरुराम यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. संगरुराम यांच्या अचानक झालेल्या मृत्यूवरुन संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com