Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: गोव्यात मुसळधार पाच दिवस पावसाची शक्यता; IMD कडून रेड अलर्ट जारी

Goa Rain : गेल्या पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता गोवा हवामान विभागाने वर्तविली आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच गोव्यातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच धांदल ऊडाली होती.

गेल्या पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या भागांना सतर्कतेचा इशारा

बार्देश, तिसवाडी, मुरगाव,सासष्टी, केपे या किनारी तालुक्यांना प्रथम मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच येत्या २४ तासांत गोव्यातील किनारी भागांतील जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी भुस्खलनामूळे घरे पडली आहेत.  

कोठे किती पावसाची नोंद

उत्तर गोव्यात आतापर्यंत एकूण म्हणजेच ९०.५० इंच तर दक्षिण गोव्यात ८५.४३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात सरासरीच्या तुलनेत ५०.१ टक्के तर दक्षिण गोव्यात ४७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नागरिकांना गरज असल्यास बाहेर पडण्याचे आवाहन गोवा हवामान विभागाने केले आहे. जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेतही पाऊस कमी होता; परंतु जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरला आहे. तो अद्याप कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

Fake RTO Challan: पार्सलचा बहाणा, चलनाचा धाक! सायबर ठगांचा आर्थिक हल्ला; कॉल फॉरवर्डिंग, एपीके फाइलच्या माध्यमातून गंडा

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

SCROLL FOR NEXT