Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Goa Monsoon 2024: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात पुढील दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा राज्यात हजेरी लावणार आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याकाळात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसांत तुरळक ठिकाणे वगळता दोन्ही जिल्ह्यात पावसाने दडी मारली. पावसाचा जोर ओसरल्याने वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या पडझडीच्या घटना देखील कमी झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

Crime News: 13 वर्षीय मुलीने गळफास घेत संपवलं जीवन, वडिलांचा शाळेतील विद्यार्थ्यावर गंभीर आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT