Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

Goa Weather Update: तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. पुढील तीन दिवस देखील राज्यावर पावसाचे सावट असून, गोमंतकीयांची दिवाळीत पावसात जाणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ३१ ऑक्टोबर ते ०१, ०२ नोव्हेंबर रोजी राज्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हे तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

३१ ऑक्टोबर (पुढील तीन ते चार तास महत्वाचे)

उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील तीन ते चार तास अधिक महत्वाचे असून, याकाळात उत्तरेत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पेडणे, सत्तरी आणि डिचोलीत ढगाळ वातावरण पाहायला मिळत असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT