Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता; गोवा वेधशाळेने दिला यलो अलर्ट

गेल्या 24 तासात केपेमध्ये सर्वाधिक पाऊस

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Monsoon 2023: गोव्यात रविवारी, 17 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा वेधशाळेने राज्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात केपे तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची माहितीही गोवा वेधशाळेने दिली आहे.

राज्यात 17 सप्टेंबर रोजी पहाटे साडे आठ पर्यंतच्या गेल्या 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. यात सर्वाधिक 70.2 मिलिमीटर पाऊस केपे येथे झाला आहे.

गेल्या 24 तासात झालेला पाऊस

  • केपे - 70.2 मिलिमीटर

  • साखळी - 32.6 मिलिमीटर

  • दाबोळी - 27.6 मिलिमीटर

  • काणकोण - 16.2 मिलिमीटर

  • मुरगाव - 14.6 मिलिमीटर

  • पणजी - 10.3 मिलिमीटर

सप्टेंबर हा नैऋत्य मॉन्सून पावसाचा अखेरचा महिना असतो. गोव्यात एकूण हंगामातील खूप कमी पाऊस या महिन्यात पडत असतो. दरम्यान, 18 सप्टेंबर रोजीदेखील राज्यासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नागरिकांना पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाऊ नये, घराबाहेर पडण्याआधी वाहतूक कोंडीची स्थिती पाहा, जुन्या इमारतींजवळ उभे राहू नका, अशा सूचना यलो अलर्ट अंतगर्त देण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT