Mumbai-Goa Highway: एसटी बसचा चक्काचूर! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

थोडक्यात बचावले 19 प्रवासी; भरधाव बसची कंटेनरला धडक
ST Bus Accident On Mumbai Goa Highway
ST Bus Accident On Mumbai Goa HighwayDainik Gomantak

ST Bus Accident On Mumbai Goa Highway: खड्डे, रखडलेले आणि लांबलेले काम यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज, रविवारी एका एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसने कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघातात एक जण ठार झाला आहे. सुदैवाने बसमधील 19 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. हे 19 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

ST Bus Accident On Mumbai Goa Highway
Konkan Railway Police Assault: धक्कादायक! साध्या वेशातील पोलिसाला मारहाण; मडगाव रेल्वे स्थानकातील घटना

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावाजवळ हा अपघात घडला. ही बस मुंबईवरून राजापूरकडे चालली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त मार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सध्या गणेशोत्सव दोन दिवसांवर आल्याने मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी, खासगी बसेस तिकडून येताना फुल्ल होऊन येत आहेत. या एसटी बसमधूनही अनेक गणेशभक्त चाकरमानी प्रवास करत होते.

पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com