Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात पुढील 3 - 4 तास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा

राज्यात मंगळवारी गणपती बाप्पाचे आगमण होत असताना मान्सून सरी कोसळण्याची शक्यता

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात मागील बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली, सोमवारी राज्यातील दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

राज्यात मंगळवारी गणपती बाप्पाचे आगमण होत असताना मान्सून सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील तीन ते चार तासांत दोन्ही जिह्यात पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

गोवा वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार तासांत उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुरगाव, फोंडा, धारबांदोडा आणि इतर काही तालुक्यात सध्या पावसाचे ढग जमा झाले आहेत. अशी माहिती वेधशाळेने दिली आहे.

गोव्यात जुलैपासून मुसळधार पावासाची नोंद झालेली नाही, ऑगस्ट महिन्यात देखील पावसाच्या किरकोळ सरी वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही.

सप्टेंबर महिन्याचे केवळ दहा दिवस शिल्लक असताना राज्यात मोठ्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली नाही. पुढील तीन ते चार दिवसांसाठी वेधशाळेने देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरदेखील कोरडाच जातो की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT