Goa Monsoon 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यावर मान्सून नाराज? गणेशोत्सवही कोरडाच जाण्याची शक्यता

मुसळधार पावसासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार असे दिसतंय.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात जुलै महिन्यानंतर समाधाकारक पाऊस झालेला नाही. राज्यातील जनता पावसाची वाट पाहत असताना हवामान खात्याकडून मात्र येत्या काळात दमदार पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.

त्यामुळे राज्यात गणेशोत्सव देखील कोरडाच जाण्याची शक्यता असून, मुसळधार पावसासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार असे दिसतंय.

गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 21 सप्टेंबर याकाळात हवामानाबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान, मागील दोन दिवसांसाठी (शनिवार, रविवार) राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, किरकोळ सरी वगळता कोठेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही.

शेतकऱ्यांसाठी वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या 23 सप्टेंबरपर्यंत राज्यातील दोन्ही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात ऑगस्टमधील किरकोळ स्वरूपाचा पाऊस वगळता सप्टेंबरमध्ये आत्तापर्यंत अतिशय कमी पावसाची नोंद झालीय. IMD नुसार, राज्यात 7 ते 13 सप्टेंबर दरम्यान सरासरी 2.7 इंच पावसाच्या तुलनेत सरासरी 3.46 इंच पाऊस झाला असून, 27 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासांत केपे येथे 2.7 इंच, साखळी 1.28 इंच, दाबोळी 1.08 इंच, काणकोण 0.63 इंच, मुरगाव 0.57 इंच आणि पणजी 0.4 इंच पाऊस झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT