Heavy Rainfall Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Heavy Rainfall Alert In Goa: सतर्क राहा! तीन दिवस गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा

29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

Pramod Yadav

Heavy Rainfall Alert In Goa: दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यापासून पूर्वमध्य अरबी समुद्र आणि ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे तीन दिवसांसाठी गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, याकाळात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विदर्भ आणि पुण्यात पाऊस सक्रीय असून, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूसह तेलंगणा आणि किनारी कर्नाटक प्रदेशात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने कर्नाटकातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच, अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचेही प्रकार समोर आले.

देशात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मान्सून माघारी परतत आहे. मात्र, निरोपाच्या आधी मान्सून पुन्हा एकदा या राज्यांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 7 ते 10 दिवस या भागात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने लोकांना भूस्खलनाबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या राज्यात यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT