Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा काय?

याकाळात 30-40 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात बुधावारपासून पावासाने जोर धरला आहे. गोवा हवामान खात्याने आज (गुरुवारी) राज्यात वादळी वारे आणि वीज कडकडाटासह मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला आहे.

याकाळात 30-40 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 23-23 सप्टेंबर असे दोन दिवसांसाठी कोणताही हवामानाचा इशारा देण्यात आला नाही.

पण, त्यापुढील 24 आणि 25 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

दरम्यान, मागील दोन दिवसांसापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक दिवस दडी मारलेल्या पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT