Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात 15 सप्टेंबरपासून 4 दिवस मुसळधार बरसणार पाऊस; गोवा वेधशाळेचा अंदाज

18 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: सप्टेंबर हा नैऋत्य मॉन्सून पावसाचा अखेरचा महिना असतो. गोव्यात एकूण हंगामातील खूप कमी पाऊस या महिन्यात पडत असतो. बहुतांश पाऊस पहिल्या तीन महिन्यातच पडत असल्याचे गोव्यातील पावसाच्या नोंदीवरून दिसून येते. दरम्यान, आता राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे.

तथापि, उद्यापासून म्हणजेच शुक्रवार, 15 सप्टेंबरपासून मात्र राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचे असतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे.

15 सप्टेंबरपासून सलग चार दिवस म्हणजेच, 15, 16, 17 आणि 18 सप्टेंबर रोजी राज्याच्या दोन्ही जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, गोवा वेधशाळेने आगामी आज, गुरूवारी 14 सप्टेंबर रोजीदेखील काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. बार्देश, तिसवाडी, मुरगाव, सासष्टी, केपे, काणकोण येथे ढग जमा होत असून ते पूर्वेकडे सरकत असल्याचे वेधशाळेने म्हटले होते.

त्यामुळे नागरीकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाऊ नये, घराबाहेर पडण्याआधी वाहतूक कोंडीची स्थिती पाहा, जुन्या इमारतींजवळ उभे राहू नका, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT