Goa Monsoon 2023 Withdrawal:
Goa Monsoon 2023 Withdrawal:  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यातून या आठवड्यात मॉन्सून घेणार निरोप; तज्ज्ञांचा अंदाज

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023 Withdrawal: नैऋत्य मॉन्सूनने देशभरातून माघार घेण्यास सुरवात केली आहे. राजस्थान, उत्तर महाराष्ट्र, मध्य भारतातून बऱ्याच ठिकाणांहून मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे.

तथापि, गोव्यातून अद्याप मॉन्सूनने माघार घेतलेली नाही. गोव्यातून या आठवड्यात मॉन्सून निरोप घेऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाच दिवस कोरडे हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशातून मॉन्सून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती समजली जाते. या काळात ट्रोपोस्फियरमध्ये बदल होतात, आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. गोव्यात या आठवड्यात हे सर्व बदल होताना दिसतील.

त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस गोव्यातून मॉन्सूनची माघार होईल, असे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून, राज्यातील कमाल तापमान सातत्याने 32 अंश सेल्सियसहून अधिक नोंदले गेले आहे. तापमानातील ही वाढ मान्सूननंतरच्या पावसात लक्षणीय घट झाल्यामुळे झालेली असू शकते. शिवाय वाऱ्यांमध्येही बदल होताना दिसत आहेत.

हवेच्या तापमानात झालेली वाढ अधिक रखरखीत हवामानाकडे येऊ घातलेल्या बदलाचे सूचक आहे. जुने गोवा हवामान केंद्रावरील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण मागील दिवसांच्या तुलनेत किंचित घटले आहे.

दरम्यान, यंदाच्या मॉन्सून हंगामात गोव्याला दिलासा मिळालेला आहे. अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसाने राज्यातील सर्व पाणीसाठे भरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT