Benaulim Attack Case: बाणावलीत युवकावर हल्ला प्रकरणात फरार असलेले 3 संशयित अखेर आले शरण

कोलवा पोलिसांनी घेतले ताब्यात, लोखंडी सळीने युवकाला केली होती मारहाण
Benaulim Attack Case
Benaulim Attack CaseDainik Gomantak

Benaulim Attack Case: बाणावली येथे पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून अलॉयसीस बार्रेटो या तरूणाला काही जणांनी मारहाण केली होती. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी तिघे जण फरार झाले होते.

त्यानंतर आज, मंगळवारी या हल्ल्यात सहभागी असलेले तिघेही संशयित पोलिसांत शरण आले आहेत.

Benaulim Attack Case
Vijai Sardesai: हा जोक आहे की, हीच भाजपची पॉलिसी आहे? आठवलेंच्या वक्तव्यावर आमदार सरदेसाई संतप्त

आकाश आटवेकर (रा. बोर्डा, मडगाव), सिद्धेश नाईक (रा. राया, सासष्टी), केशवर रामगिरी (रा. चांदोर) अशी त्यांची नावे आहेत. कोलवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून या सर्वांकडे चौकशी केली जात आहे.

अलॉयसीस बार्रेटो याच्यावर सॅम्युअल मास्कारेन्हस याने लोखंडी सळीने हल्ला झाला होता. त्यात बार्रेटो गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस निरीक्षक थेरन डिसोझा हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सॅम्युअल हा दहा दिवसांच्या सुटीवर लंडनमधून गोव्यात आला होता. रविवारी तो परत जाणार असल्याने त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती.

Benaulim Attack Case
Mahadayi Water Dispute: कळसा प्रकल्पासाठी वनजमीन मंजूर; 1 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्नाटककडून निविदा

रात्री 2 वाजता हॉटेलबाहेर सॅम्युअल आणि त्याच्या मित्रांचा दुसऱ्या एका गटाशी वाद झाला व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या वेळी सॅम्युअलच्या गटातील एकाने विरुद्ध गटातील एकावर रॉडने वार केला.

या प्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. संशयित सॅम्युअल मोपा विमानतळावर विमानात बसला असतानाच कोलवा पोलिसांनी त्याला तिथूनच ताब्यात घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com