Goa AAP Leader Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Sextortion Case: सरकारनेच केला 'सेक्स्टॉर्शन' प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल, यात पोलिसांचाही हात; अमित पालेकरांचा आरोप

Goa AAP Leader Amit Palekar: पोलिसांनी सहकार्य केले असेल तर फेरेरा यांनी लगेच गोवा राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करावी, असे पालेकर म्हणाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: 'सेक्स्टॉर्शन' प्रकरणात सरकारनेच हा व्हिडिओ व्हायरल करायला लावला असून, यात पोलिसांच्या गुन्हे शाखेचा हात आहे, असा थेट आरोप आम आदमी पक्षाचे गोवा राज्य संयोजक अ‍ॅड. अमित पालेकर यांनी आज (11 डिसेंबर) केला.

पालेकर म्हणाले की, आमदार कार्लुस फेरेरा हे तक्रारदार आहेत आणि त्यांनी तक्रार नोंदवून एक व्हिडिओ पुराव्यांच्या रूपात गुन्हा शाखेला दिला होता. जर संशयित आरोपी कोठडीत आहे तर हा व्हिडिओ व्हायरल कुणी व्हायरल केला? कोणाचे एक्स अकाऊंट आहे, हे शोधून काढणे सहज शक्य आहे. परंतु, सरकारला ते करायचे नाही.

पालेकर पुढे म्हणाले, जर एका आमदाराने केलेल्या तक्रारीचा पुरावा असलेला व्हिडिओ संशयित आरोपी कोठडीत असताना व्हायरल होत असेल तर सामान्य व्यक्ती पोलिसांवर कसा विश्वास ठेवतील ? सरकारने हे कृत्य केले असेल आणि यात जर पोलिसांनी सहकार्य केले असेल तर आमदार फेरेरा यांनी लगेच गोवा राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करावी.

अकाऊंट तयार करणाऱ्याला अटक करा

पालेकर पुढे म्हणाले, व्हायरल केलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही हे पोलिस तपासतील. त्यात बोलणे योग्य नाही. गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक या सर्व प्रकरणांत जबाबदार आहेत. त्यामुळे यावर अधीक्षकांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

जर संशयित आरोपी कोठडीत असेल तर हे कसे घडले आणि ज्यांनी केवळ व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी अकाऊंट तयार केला, त्याला अटक झाली का याची सर्व उत्तरे अधीक्षकांनी देणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT