Red Mouth Monkey Dainik Gomantak
गोवा

MLA Deviya Rane: सत्तरीतील शेतकऱ्यांच्या व्यथा आमदार राणेंनी विधानसभेत मांडल्या; म्हणाल्या, कृषी खात्याच्या योजना..

MLA Deviya Rane: जंगली जनावरांचा उपद्रव वाढला

Ganeshprasad Gogate

MLA Deviya Rane: सत्तरी तालुक्यातील शेतकरी सध्या जंगली जनावरांच्या उपद्रवाने पुरते हैराण झाले असून लाल तोंडाच्या माकडांकडून नारळ,केळी, काजू व अन्य उत्पन्नांची नासधूस‌ नासधूस सुरु आहे.

या जनावरांना प्रतिबंध घालण्यासाठी कृषी खात्याच्या योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असून याच संदर्भात पर्येच्या आमदार डॉ.देविया राणेंनी शनिवारी विधानसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्याची बातमी आज गोमंतकने प्रसारित केली होती. याचाच पाठपुरावा करत देविया राणे यांनी हा विषय विधानसभेत मांडला.

सध्या सत्तरी तालुक्यात विविध गावांत गवे, रानडुक्कर, खेती, माकड यांचा मुक्त संचार दिसून येतो आहे. नगरगाव पंचायत भागातील गावांतील लोकांना याचा मोठा त्रास होताना दिसत आहे. गवे बागायतीत, रस्त्यावर फिरताना दिसून येतात.

त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोक्याचे बनले आहे. या कठीण परिस्थितीमुळे बागायतदारांचे शेतीतील अर्थकारण, व्यवस्थापन बिघडले असून यावर काय उपाय करावा, या विवंचनेत ते आहेत.

तांबड्या तोंडाच्या खेत्या माकडांनी कोवळ्या नारळांचे प्रचंड नुकसान केले आहे. या खेत्या माकडांचा प्रताप महाभयंकर आहे.

ती बागायतीत घुसताना 30-40 च्या संख्येने घुसत असून त्यांना अटकाव करणे कठीण झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा पर्येच्या आमदार डॉ.देविया राणेंनी शनिवारी विधानसभेत मांडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT