Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: माझ्या संस्कृतीत अपशब्द नाहीत! मात्र आता लोकांनी आरजीवाल्यांपासून सावध राहण्याची गरज- ढवळीकर

Sudin Dhavalikar: विकसीत भारतच्या कार्यक्रमाला आरजीवाले गोंधळ घालणार असल्याचे आधीच कळाल्यामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता

Ganeshprasad Gogate

Sudin Dhavalikar: मी कुणालाही अपशब्द वापरले नाहीत, माझ्या संस्कृतीत अपशब्द, शिविगाळ नाही, कुणीही सांगेल मी कधी कुणाला अपशब्द वापरले आहेत की नाही ते? फक्त या तथाकथित आरजीवाल्यांना तुम्ही इथे का, एवढेच विचारले, नेमके तेच बोट धरून माझ्या तोंडी काही तरी घातले गेले, असे स्पष्ट विधान मडकई मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.

खरे म्हणजे समाजासाठी आरजीवाले कलंक असून समाजापर्यंत काहीही पोचवण्याचा प्रयत्न या लोकांच्या माध्यमातून होत असल्याने लोकांनीच आता सावध राहिले पाहिजे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

काल बांदोडा येथे विकसीत भारत कार्यक्रमाला उपस्थित आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासमोर आरजीच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तो रोखण्यासाठीच मी प्रयत्न केले, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

विकसीत भारतच्या कार्यक्रमाला आरजीवाले गोंधळ घालणार असल्याचे आधीच कळाल्यामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता, पण आपण तसे काही होऊ देणार नाही, असे जाहीर आश्‍वासन दिल्याने विश्‍वजीत राणे कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

वास्तविक या कार्यक्रमात कुणाला आपले मत मांडायचे असल्यास त्यांनी गटविकास अधिकारी किंवा मामलेदार अथवा सरपंचाकडे नोंद करावेत, असे सांगितले होते.

पण आरजीवाल्यांनी तसे काहीच केले नाही, उलट कार्यक्रम संपत आला असतानाच त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली म्हणून आम्ही तो रोखण्याचा प्रयत्न केला, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

आरजीचे अकरा लोक कार्यक्रमस्थळी आले होते, ते फक्त गोंधळ घालण्यासाठीच असा आरोप करून सुदिन ढवळीकर म्हणाले की, आपण शिविगाळ केली नाही, उलट याच लोकांनी मडकई मतदारसंघातील काही प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न केला, लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला, प्रसंगी मला स्वतःला शिविगाळ केली, पण मी अपशब्द काही उच्चारला नाही, असेही सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

दोन महिन्यांपूर्वी ‘सीएम'ना दिला होता नोट!

दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आरजीच्या काही हरकती घेण्यासारख्या कृतीमुळेच एक नोट घातला होता. आरजीवाल्यांनी सातत्याने मडकई मतदारसंघातील काही प्रकल्पांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.

मात्र मी बधलो नाही. आताही मुख्यमंत्र्यांनी वेळीच कारवाई करणे आवश्‍यक आहे, अन्यथा या लोकांना आणखी उगाच गोंधळ घालण्यास बळ मिळेल, असे सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT