गोवा

Goa : मिरामार पुतळ्याजवळील फलक हटविला

पर्यावरणप्रेमी, इतिहास अभ्यासकांच्‍या आक्षेपानंतर कार्यवाही (Goa)

Mahesh Tandel, Avit Bagle

पणजी : मिरामार येथील ‘जय जवान जय किसान’च्या पुतळ्याच्या खाली लावलेला कसिनोचा (Casino) फलक पर्यावरणप्रेमी व इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांच्या तीव्र आक्षेपानंतर त्वरित काढून टाकण्यात आला. याबाबत प्रा. साखरदांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मिरामार (Miramar) पणजी (Panjim) येथील सर्कलजवळ ‘जय जवान, जय किसान’ पुतळा आहे. त्याच्या खालील भागात एका कसिनो कंपनीचा जाहिरात फलक (Advertising Board) कुणीतरी लावला होता. काही दिवसांपूर्वी तेथे तो फलक नव्हता, मात्र कालपासून तो फलक तेथे दिसताच कांपाल भागात राहणारे आर्मांडो गोन्साल्‍विस यांनी इतिहास अभ्यासक प्रा. साखरदांडे यांना याबाबत कल्पना दिली.

प्रा. साखरदांडे यांनी मिरामार भागाचे नगरसेवक बेंतो लोर्ना यांना याबाबत कळवले व सदर फलक तेथून त्वरित हटवण्याची मागणी केली. त्यानुसार बेंतो लोर्ना यांनी पुढाकार घेऊन तो कसिनोचा फलक हटवला. दरम्यान. त्या फलकाचे छायाचित्र सोशल मीडियावर अद्यापही फिरत असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देतानाच सरकार व महापालिका यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT