Goa Ministers reacted On Amit Shah statement  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावर काय म्हणाले गोव्यातील मंत्री, वाचा सविस्तर...

मंत्र्यांना विचारणा केली असता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणे सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्याचा निर्णय झाला आहे. या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून राज्यातील नागरिक आक्रमक झाले असून असंतोष वाढला आहे.

याबाबत मंत्र्यांना विचारणा केली असता ते माध्यमांना चुकवण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणे सुरू आहे. एका अर्थाने ही पळापळ टोलवाटोलवी सुरू आहे.

कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला असून यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना हे पाणी मिळेल, असे जाहीर केले.

दरम्यान, यामुळे लोकांचा पारा अधिकच चढलेला दिसतो. माध्यम प्रतिनिधींनी राज्यातील मंत्र्यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली आहेत.

आज सकाळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यटन भवनमध्ये आले असता त्यांना पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता ते दुसऱ्या दरवाजातून निघून गेले.

त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आज कॅन्सर दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘याबाबत सरकारचे मत मुख्यमंत्री सावंत व्यक्त करतील, तुम्ही त्यांनाच विचारा’ असे सांगून विषय टोलवला.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असे म्हटले.

तर जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी आपण शहा यांच्या वक्तव्याशी असहमत असून आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असे सांगितले.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ‘आमची न्यायालयीन बाजू भक्कम आहे’, असा दावा केला आहे. त्यामुळे सध्या तरी याप्रकरणी पळापळी आणि टोलवाटोलवी सुरू आहे.

म्हादई विषयावर मंत्र्यांच्या प्रतिक्रिया

"मी व्यक्तिशः शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. शहा यांच्या बैठकीत आम्ही केवळ म्हादई वाचवावी एवढीच विनंती त्यांना केली होती आणि यावरच चर्चा झाली."

- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री

"म्हादई हा विषय माझ्या तालुक्याशी संबंधित आहे. मी माझ्या तालुक्यातील लोकांबरोबर असून म्हादई वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, आमचे नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आहेत. तेच यावर आपले आणि सरकारचे मत व्यक्त करतील. तुम्ही त्यांनाच विचारा."
- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

"आमची न्यायालयातील बाजू भक्कम असून लवकरच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. म्हादई वाचवण्याबाबत माझे सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही म्हादई वाचवू."
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत मी असहमत आहे. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडत असून न्यायालय आपल्याला योग्य तो न्याय देईल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कर्नाटकाला पाणी वळवून देणार नाही."
- सुभाष शिरोडकर, जलस्त्रोत मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

SCROLL FOR NEXT