Minister Nilkanth Halarnkar DIP
गोवा

Minister Nilkanth Halarnkar: कार बाजूला घेण्यावरुन उफळला वाद; मंत्री हळर्णकरांच्या ‘पीएसओ’कडून अभिनेत्याविरुद्ध तक्रार

रेवोडा येथे गाडी बाजूला घेण्याच्या प्रकारावरुन मंत्री नीळकंठ हळर्णकरांचे पीएसओ, कारचालक आणि एका प्रसिद्ध अभिनेत्यामध्ये वाद उफाळला.

गोमन्तक डिजिटल टीम

रेवोडा येथे गाडी बाजूला घेण्याच्या प्रकारावरुन मंत्री नीळकंठ हळर्णकरांचे पीएसओ, कारचालक आणि एका प्रसिद्ध अभिनेत्यामध्ये वाद उफाळला. गौरव बक्षी असे या अभिनेत्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१०जुलै) सायंकाळी ४च्या सुमारास रेवोडा पंचायतीजवळ घडली. या प्रकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले.

उपलब्ध माहितीनुसार, या अभिनेत्याविरुद्ध मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या पीएसओने (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली. कारण नसताना रेवोडा येथे बक्षी यांनी मंत्र्यांची गाडी अडवून अडथळा निर्माण केल्याचे ‘पीएसओ’ने तक्रारीत म्हटले. तसेच बक्षी यांनीही आपली तक्रार दिली आहे.

बक्षी हे मूळचे दिल्लीचे असून सध्या ते ताळगावात वास्तव्य करतात,असे समजते. मंत्री हळर्णकर हे रेवोडा पंचायत कार्यालयस्थळी वृक्षारोपणासाठी आले होते. तेव्हा रस्त्यावर हा वाद झाला. बक्षी यांनी दावा केला की, आपण पंचायतीत एका कामासाठी आलो होतो. तर, रस्त्यावर मधोमध कार असल्याने चालकास मी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही.

बक्षीचे आरोप निराधार; त्यानेच वाट अडवली!

मंत्री नीळकंठ हळर्णकरांनी रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले,की बक्षी यांनी केलेले सर्व दावे निराधार आहेत. उलट बक्षी यांनीच आपल्या गाडीची वाट अडविली. संशयिताने आपल्या ‘ओएसडी’कडे फोन करून आपला राष्ट्रपती तसेच पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क आहे, असे उलट सांगू लागला. पोलिसांनी या संशयितावर कायद्यानुसार कडक कारवाई करावी. कारण, एका लोकप्रतिनिधी तथा मंत्र्यांशी अशाप्रकारची वागणूक योग्य नाही, असेही मंत्री हळर्णकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खाकीला काळिमा फासणाऱ्या पोलिसांची आता खैर नाही! पर्यटकांकडून पैसे उकळणाऱ्या पाच जणांची शिक्षा हायकोर्टाकडून कायम

Baina Robbery Case: 70 लाखांचे सोने गेले कुठे? बायणा दरोड्याला 40 दिवस उलटले तरी दागिने मिळेनात; नायक कुटुंबीयांची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा!

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

SCROLL FOR NEXT