Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: 'माझी ॲलर्जी असणाऱ्या माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केला', आरोपांच्या वक्तव्यावर गावडेंचा घूमजाव!

Govind Gaude Controversy: कारवाईची टांगती तलवार असलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी (28 मे) चक्क ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका वठवली. फोंडा येथील प्रेरणा दिन कार्यक्रमातील आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केला, असे खापर त्यांनी माध्यमांवरच फोडले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कारवाईची टांगती तलवार असलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी (28 मे) चक्क ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका वठवली. फोंडा येथील प्रेरणा दिन कार्यक्रमातील आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केला, असे खापर त्यांनी माध्यमांवरच फोडले. दुसरीकडे गावडे यांना मंत्रिपदावरून हटविण्‍यासाठी प्रदेश भाजपकडून मुख्‍यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे.

गावडे यांनी बुधवारी (28 मे) मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली. त्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना- मुख्यमंत्री डॉ. सावंत हे आपले जवळचे मित्र असल्‍याचे सांगत आदिवासी भवन आणि आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर आपण बोलल्याचे नमूद केले. मात्र, त्याचा चुकीचा संदर्भ घेत आपली ॲलर्जी असलेल्या माध्यमांनी, पत्रकारांनी अर्थाचा अनर्थ केला, असा आरोपही त्यांनी केला.

मंत्र्यांना भाजप कार्यालयात पाचारण

आदिवासी कल्याण खात्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे (Govind Gaude) यांना गुरुवारी (ता.२९) भाजप कार्यालयात खुलाशासाठी पाचारण केले जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांच्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. नेमके काय होणार याचे अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

‘ते’ गावडेंनाच विचारा : मुख्‍यमंत्री

गावडे हे आज उटी येथून गोव्यात परतले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याविषयी मुख्यमंत्री आणि गावडे यांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी गावडे यांनी आपण सविस्तरपणे या विषयाची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिल्याचे म्हटले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांनी काय चर्चा केली ते त्यांनाच विचारा, असे सांगितले. यावरून त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना पटलेले दिसत नसल्याचे जाणवले.

वक्‍तव्‍याची चित्रफित दिल्‍लीत

मुख्यमंत्री कार्यालयाकडून वक्तव्याबाबतची ध्वनिचित्रफीत आणि त्याचे भाषांतर दिल्लीला माहितीसाठी पाठवले आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही आपले या विषयासंदर्भातील आकलन पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. आज याबाबत दिल्लीतून पक्षीय व सरकारी पातळीवर विचारणा करण्यात आली. केवळ गावडे यांचे या खेपेचेच वक्तव्य गृहीत न धरता आजवर त्यांनी पक्षासाठी केलेले व न केलेले काम, यांची गोळाबेरीजही यानिमित्ताने केली जात आहे.

२५ मे रोजी फोंडा येथे राजीव गांधी कला मंदिरातील सरकारी कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तेथे मी काय म्हणालो , यातील प्रत्येक क्षण सर्वांसमोर आहे. माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केल्याने मुद्दाम प्रवास करून मी आज गोव्यात (Goa) आलो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो.  मुख्यमंत्र्यांनी या विषयावर केलेल्या वक्तव्यावर मी बोलू शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्या संदर्भाने बोलले, हे मला ठाऊक नाही.

गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

राज्यपालांशी चर्चा नाही

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई केरळातून गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. अथवा मुख्यमंत्री आणि त्यांची भेट झालेली नाही. राज्यपाल आज काणकोण दौऱ्यावर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT