Workar Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: 'बारा वर्षात बराच त्रास सोसला...', ट्रक मालकांनी व्यक्त केली खंत; जनसुनावणीत सावर्डेत खाण सुरु करण्याची मागणी

Goa mining Resumption: गेली बारा वर्षे खाण सुरू कधी होणार याकडे आमचे लक्ष लागून राहिलेले आहे, असे यावेळी ट्रक मालकांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: राज्यातील खाण व्यवसाय बंद पडून बारा वर्षे उलटून गेल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हा व्यवसाय पर्यावरणाचे रक्षण करून तसेच सामान्य लोकांना त्रास न होता सुरू करण्यात यावा, अशी मागणी सावर्डे येथे बुधवारी झालेल्या जनसुनावणीवेळी खाण अवलंबितांनी केली.

सावर्डे येथील श्रीस्थळ सभागृहात फोमेंतो कंपनीच्या (ब्लॉक ४) कुड्डेगाळ येथील खनिज खाणीविषयी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Goa Pollution Control Board) जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीला मोठ्या संख्येने खाण अवलंबित उपस्थितीत होते. २०१२ पासून खाण व्यवसाय बंद पडल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना बरेच त्रास सहन करावे लागले आहेत. गेली बारा वर्षे खाण सुरू कधी होणार याकडे आमचे लक्ष लागून राहिलेले आहे, असे यावेळी ट्रक मालकांनी सांगितले. हा व्यवसाय बंद पडल्याने आमचे ट्रक एकाच जागेवर पडून असल्याने निकामी झाले असून आता तरी आम्हाला काम मिळेल का या आशेवर आम्ही जगत असल्याचे ट्रक व्यावसायिकांनी सांगितले.

खनिज वाहतूक बंद झाल्याने अनेकांनी आपले दागदागिने विकून बँकांचे हफ्ते फेडले आहेत. खाण व्यवसाय बंद असूनही फोमेंतो कंपनीकडून सावर्डे पंचायतीला देखभाल व इतर खर्च दिला जात असल्याचे पंच संजय नाईक यांनी यावेळी सांगितले. हा व्यवसाय सुरू करताना पर्यावरणाचा समतोल राखून तसेच खनिज वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करून सुरू करावा. मागील काळात या वाहतुकीमुळे (Transportation) सामान्य लोकांना त्रास होताना दिसत होता. यासाठी सामान्य लोकांना त्रास न करता ही वाहतूक करण्यावर कंपनीने भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. खाण व्यवसाय सुरू करण्यास लोकांनी सहकार्य दिल्याने कंपनीने जास्तीत जास्त सीएसआर निधीतून लोकांना सहकार्य करावे, असे नाईक यांनी सांगितले.

कामगारांनी केला आनंद व्यक्त

या जनसुनावणीवेळी मोठ्या प्रमाणात ट्रक व्यावसायिक व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांनी गर्दी केली होती. फोमेंतो कंपनीच्या खाणीविषयी ही सुनावणी असल्याने या भागातील या कंपनीच्या कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक, पंच शशिकांत नाईक, बाबू सावंत, नीतेश नाईक आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT