mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : ई-लिलावात सरकारला मोठी बोली; ‘मोंत द शिरगाव’ला 111.28 टक्के महसुलाची हमी

ई-लिलावात मोठी बोली लावल्याने राजाराम बांदेकर कंपनीकडेच पुन्हा खाणीची मालकी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining : राज्य सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने आज करण्यात आलेल्या ‘मोंत द शिरगाव’ या खाणीला ई-लिलावात सरकारला मोठी बोली मिळाली. या खाणीसाठी मे.राजाराम बांदेकर कंपनीने तब्बल 111.28 टक्के महसुलाची हमी देत ही खाण आपल्याच ताब्यात ठेवली, अशी माहिती खाण खात्याने दिली आहे.

एमएसटीसीच्या (मेटल स्क्रॅप ट्रेड कार्पोरेशन) ई-कॉमर्सच्या साहाय्याने राज्यातील चार ब्लॉक्ससाठी ई-लिलाव सुरू आहे. यातील ब्लॉक क्र. 1 ही डिचोली खाण वेदांताने तर ब्लॉक क्र. 2 शिरगाव- मये खाण साळगावकर शिपिंग कंपनीने मिळवली आहे. आज लिलावासाठी पाच बोलीधारक पात्र ठरले होते. बांदेकर कंपनीची बोली 100 टक्क्यांवरची असली तरी ही किंमत इंडियन ब्युरो ऑफ मायनिंगने प्रत्येक महिन्याला जाहीर केलेल्या सरासरी विक्री किमतीवर ही बोली असते. ही किंमत बाजारातील खनिज मूल्यापेक्षा नेहमीच कमी असते. त्यामुळे खनिज कंपन्यांना हा व्यवहार परवडतो.

9.59 मिलियन टन खनिज अपेक्षित

शिरगावच्या हद्दीत येणारा हा मोंत द शिरगाव खनिज ब्लॉक-3 आहे. हा 95.67 हेक्टरमध्ये विस्तारलेला असून त्यापैकी 29.80 हेक्टर खनिज भूभाग आहे. यात 65.87 हेक्टर खनिज सोडून अन्य भूभाग येतो. या ठिकाणाहून 57.39 टक्के दर्जाचे 9.59 मिलियन टन खनिज अपेक्षित आहे. शेवटच्या काले खाणीचा आता मंगळवारी ई-लिलाव होणार आहे. सोमवारी या खाणी संदर्भातले पात्र बोलीधारक जाहीर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT