Goa mining Dainik Gomantak
गोवा

Goa mining: आनंदम, व्यंकटेश्वरना प्रत्येकी दोन खाण पट्टे, चार खाणपट्ट्यांचा लिलाव पूर्ण; दोन पट्ट्यांचा निर्णय सुनावण्‍यांनंतर

Goa mining lease auction 2026: खाण खात्‍याने लिलाव पुकारलेल्‍या सहापैकी चार खाण पट्ट्यांचा आतापर्यंत लिलाव झालेला असून, आनंदम मिनरल आणि व्‍यंकटेश्‍‍वर राव या दोन कंपन्‍यांना प्रत्‍येकी दोन खाण पट्टे मिळाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: खाण खात्‍याने लिलाव पुकारलेल्‍या सहापैकी चार खाण पट्ट्यांचा आतापर्यंत लिलाव झालेला असून, आनंदम मिनरल आणि व्‍यंकटेश्‍‍वर राव या दोन कंपन्‍यांना प्रत्‍येकी दोन खाण पट्टे मिळाले आहेत. दोन खाण पट्ट्यांबाबत पुढील चार दिवसांत उच्च न्‍यायालयात सुनावणी होईल. त्‍यानंतर त्‍यांच्‍या लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘‘ब्‍लॉक क्रमांक १४ ते १८ अशा सहा खाण पट्ट्यांचा ई–लिलाव करण्‍याचा निर्णय खाण खात्‍याने घेतलेला होता.

त्‍यानुसार त्‍याबाबतची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. यातील कुडणे आणि पिसुर्ले येथील चार खाण पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली असून, कुडणे आणि पिसुर्लेतील खाण पट्टे आनंदम मिनरलला, तर कुडणे आणि अडवालपाल येथील खाण पट्टे व्‍यंकटेश्‍‍वर राव यांच्‍या कंपन्‍यांना मिळाले आहेत’’, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

‘‘सहापैकी उर्वरित दोन खाण पट्ट्यांचेही लिलाव करण्‍यात येणार आहेत. परंतु, त्‍यासंदर्भात उच्च न्‍यायालयात सुनावण्‍या सुरू आहेत. त्‍यातील एका प्रकरणाची सुनावणी येत्‍या सोमवारी, तर दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी २९ रोजी होणार आहे.

त्‍या सुनावण्‍यांनंतर या दोन खाण पट्ट्यांच्‍या लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. लिलाव होत असलेल्‍या सहा खाण पट्ट्यांतून १७१ दशलक्ष खनिज निघण्‍याचा अंदाज असून, त्‍यामार्फत पहिल्‍या टप्‍प्‍यात सरकारच्‍या तिजोरीत सुमारे २२० कोटींचा महसूल जमा होईल’’, असेही गाड यांनी नमूद केले.

आतापर्यंत सहा खाण पट्टे सुरू!

राज्‍यात ज्‍या अर्थव्‍यस्‍थेचा प्रमुख कणा असलेला खाण व्‍यवसाय कायदेशीर मार्गाने सुरू करण्‍याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. त्‍यानुसार आतापर्यंत १६ खाण पट्ट्यांचा लिलाव करण्‍यात आलेला असून, यापूर्वी ज्‍या बारा पट्ट्यांचा लिलाव झालेला होता, त्‍यातील सहा खाण पट्टे सुरू झालेले आहेत, असेही नारायण गाड यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT