Goa Mining Lairaid Temple: Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाण परिक्षेत्रातून शिरगाव वगळा! लईराई देवस्थान समितीची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचेही केले स्वागत

दैनिक गोमंतक

Goa Mining Lairaid Temple: केवळ शिरगाव येथील श्री लईराई देवीचे मंदिरच नव्हे, तर घरे-दारे, नैसर्गिक जलस्रोत मिळून पूर्ण गाव खाण परिक्षेत्रातून बाहेर काढा. खाण कंपन्यांनी बेकायदा हडप केलेली जमीन पुन्हा कोमुनिदादीच्या नावावर करा.

मगच कायदेशीर खाण व्यवसायाचा विचार करा, अशी मागणी शिरगावच्या श्री लईराई देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष गणेश गावकर यांनी शुक्रवारी (ता.२९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिरगावचे श्री लईराई देवीचे मंदिर खाणभागातून बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या बुधवारी मये येथे एका कार्यक्रमात केले होते.

मंदिर परिसरातील जागा सरकारची असल्यास ती मंदिराला देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेश गावकर यांनी ही मागणी केली. लईराई देवीच्या मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान स्वागतार्ह, तेवढेच आशादायक असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.

यावेळी देवस्थानचे मुखत्यार आणि उपसरपंच जयंत गावकर उपस्थित होते. शिरगाव येथे लईराई मंदिरासह लहान-मोठी मिळून 17 संलग्न मंदिरे आहेत. शिवाय साडेतीनशेहून अधिक घरे, दोन सरकारी शाळा, शेती-बागायती आणि नैसर्गिक जलस्रोत आहेत.

ही मालमत्ता खाण परिक्षेत्रात येते, अशी माहिती गावकर यांनी दिली. मंदिराचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याबद्धल आमदार प्रेमेंद्र शेट यांचेही गावकर यांनी आभार मानले.

म्हणून न्यायालयात याचिका

शिरगाव खाण ब्लॉकचा लिलाव करण्यापूर्वी खाण 'लीज'मधून गाव बाहेर काढावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती.

मात्र, ही मागणी मान्य न करताच खाण ब्लॉकचा लिलाव करण्यात आला. मंदिरासह गावचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी अखेर दोन महिन्यांपूर्वी देवस्थानतर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, असे गावकर म्हणाले.

कोमुनिदादची जमीन परत द्या

पूर्वीपासून शिरगावात जो खाण व्यवसाय सुरू होता, तो बेकायदा आणि कोमुनिदादच्या जागेत चालत होता. 1971 साली झालेल्या भू-सर्व्हेक्षणावेळी खाण कंपन्यांनी जमिनीच्या उताऱ्यात फेरफार करत कोमुनिदादची जागा गिळंकृत केली.

याला प्रशासकीय यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे, असा आरोप गणेश गावकर यांनी केला. खाण कंपन्यांनी हडप केलेली ही जागा कोमुनिदादच्या नावावर करा, मगच खाण व्यवसाय सुरू करा, अशी मागणी गावकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; 3 टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?

T20 World Record: 122 षटकार, 127 चौकार! भारतीय वंशाच्या खेळाडूची 'विराट' खेळी, गोलंदाजांसाठी ठरला काळ; टी20 मध्ये केला अचाट रेकॉर्ड

Odisha Food Poisoning: दहीवडा खाणं पडलं महागात, 27 बालकांसह 58 जणांना विषबाधा; ओडिशात खळबळ

IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचं भवितव्य दुसऱ्यांच्या हातात, चेन्नईविरुद्धच्या पराभवानं बदललं समीकरण; प्लेऑफच्या आशा धूसर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार! 4 राशींसाठी धनलाभाचा सुवर्णयोग, सूर्याचं नक्षत्र गोचर भाग्याचं; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

SCROLL FOR NEXT