Goa Mining - Mulgao  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: गाव उद्धवस्त होत असेल तर खाण व्यवसाय नको! मुळगाववासींनी ठरवलं...

खाण विरोधी जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

दैनिक गोमंतक

Goa Mining: गाव उध्वस्त होत असेल, तर आम्हाला खाण व्यावसाय नकोच. या भूमिकेशी ठाम असलेले मुळगाववासीय गावच्या अस्तित्वासाठी पुन्हा एकदा संघटीत झाले आहेत.

आज (रविवारी) गावकरवाडा-मुळगाव येथे श्री केळबाई देवस्थानात आयोजित खाण विरोधी जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 4.30 वा. या सभेला सुरवात झाली.

पंचायत, देवस्थान, कोमुनिदाद आदी ग्रामसंस्थांच्या प्रतिनिधीसह हिला मिळून शंभरहून अधिक लोक सभेला उपस्थित होते.

खाण लीज क्षेत्रातून मुळगाव गावाला वगळावे. ही मुळगावमधील जनतेची प्रमुख मागणी आहे. डिचोली खाण ब्लॉक अंतर्गत मुळगावमधील 164 हेक्टर जमीन खाण लीज क्षेत्रात दाखविण्यात आली आहे.

गावकरवाडा आणि मानसबाग येथील मिळून 230 घरे, मुळगावची ग्रामदेवी श्री केळबाई देवीच्या मंदिरासह लहानमोठी मिळून 14 धार्मिक स्थळे, शाळा, पंचायतघर यासह नैसर्गिक जलस्रोत असलेले तलाव लीजक्षेत्रात येत आहेत.

आधीच खाणबंदीपूर्वी खाण व्यवसायामुळे मुळगाव गावाचे अस्तित्व संकटात आले होते. नवीन लीजप्रमाणे खाण व्यवसाय सुरु झाल्यास भविष्यात गावाचे अस्तित्वच नामशेष होण्याची नागरिकांना भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोनवर बोलत गाडी चालवली, ट्राफिक पोलिसाला धडकला!! जुन्या गोव्यात कदंब बसमुळे 'ट्रॅफिक जॅम; Video Viral

Virat Kohli Six: वनडेत पहिल्यांदाच 'षटकार' मारुन उघडलं खातं, किंग कोहलीचा तूफानी पूल शॉट पाहून चाहतेही अचंबित; पाहा VIDEO

सुट्टी ठरली अखेरची! हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून 41 वर्षीय पंजाबी पर्यटकाचा गोव्यात मृत्यू

Goa Live News: गोव्याच्या आकाशात वर्षातील शेवटचा 'सुपरमून'! 14% मोठा चंद्र पाहण्याची संधी

World Cup 2027: 'विराट-रोहितने वर्ल्ड कप खेळू नये', KKR च्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ; चाहत्यांना धक्का!

SCROLL FOR NEXT