Court Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Mining Cases: गोवा खनन व भूविज्ञान संचालनालयाविरोधातील न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

Avit Bagle

पणजी: राज्यात चार खाणी सुरु झाल्या असल्या तरी त्या सुरू करताना खाण खात्याला मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आहे. आजच्या घडीला विविध न्यायालयात खाण व भू विज्ञान खात्याविरोधात तब्बल १३० खटले आहेत.

गोवा खनन व भूविज्ञान संचालनालयाविरोधातील न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जून २०२५ अखेर या संचालनालयाविरोधात एकूण १२२ प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित होती. मात्र, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत आणखी ८ नवी प्रकरणे दाखल झाल्यामुळे सप्टेंबर अखेर ही संख्या १३० वर पोहोचली आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरणांची संख्या जून अखेरच्या १६ वरून १८ वर, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ५४ वरून ५५ वर पोहोचली आहे. दिल्लीतील पुनरावलोकन प्राधिकरणासमोर प्रकरणांची संख्या ९ वरून १३ झाली असून, जिल्हा न्यायालयांमध्ये २६ वरून २७ इतकी किरकोळ वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय हरित लवादात १७ प्रकरणे आहेत.

खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये १, ऑगस्टमध्ये ३ आणि सप्टेंबरमध्ये ४ नवी प्रकरणे दाखल झाली आहेत. तथापि, या तिमाहीत कोणतेही प्रकरण निकाली निघालेले नाही. परिणामी, प्रकरणांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

संचालनालयाविरोधातील ही वाढती न्यायालयीन प्रक्रिया शासनाच्या खनन व पर्यावरण विषयक निर्णयप्रक्रियेवर आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे सांगण्यात येते. पुढील काळात या प्रकरणांची सुनावणी आणि निकालांवरूनच खनन क्षेत्रातील प्रशासनिक जबाबदारीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

Goa Live News Updates: कोपार्डे - ठाणे मार्गावर बस आणि बुलेटमध्ये अपघात; बुलेट चालक गंभीर जखमी

Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

SCROLL FOR NEXT