Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: खाण महामंडळ लवकरच स्थापन करु- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी स्पष्ट करून येत्या विधानसभा अधिवेशनात खाण नुकसान भरपाई विधेयक संमत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: खाण महामंडळ स्थापन करून खाणीं सुरु करण्यासाठी सरकारचे सर्वदृष्टीने प्रयत्न चालू आहेत. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी स्पष्ट करून येत्या विधानसभा अधिवेशनात खाण नुकसान भरपाई विधेयक संमत करण्यात येणार असल्याचे सांगितले. खाणी लवकरात लवकर सुरु करा. अशी मागणी करीत आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सका (Christopher Fonsca) यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या खाण कामगारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले.

खाण महामंडळ स्थापन करण्यासंबंधीचा आराखडा तयार असून, सर्व्हे आदी सोपस्कार करण्याचे काम सुरु आहे. एकदा काय खाण महामंडळ स्थापन झाले, की पुढील हंगामापर्यंत खाणी सुरु करण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे संकेतही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्वाखाली आयटकशी संलग्न असलेल्या डिचोलीतील सेझासह (वेदांता), व्ही. एम. साळगावकर (V. M. Salgaonkar) आदी खाण कंपनीच्या शंभरहून अधिक कामगारांनी शनिवारी साखळी येथे रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

कामगार नेते फोन्सेका यांनी कामगारांची कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. कामावर नसलेल्या कामगारांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना निदान 50 टक्के भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी केली. खाणी त्वरित सुरु करा. यावेळी कामगारांच्या मागणीचे निवेदनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सादर करण्यात आले.

डिचोलीतील सेझा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सिद्धेश परब, उपाध्यक्ष मानूयल फर्नांडीस, सचिव आत्माराम तिळवे, सहसचिव दिनेश दिवेकर यांच्यासह सेझा, साळगावकर आणि अन्य खाण कंपनींचे कामगार उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT