Goa: शिवोलीत रस्ता खोदून अतिक्रमण केल्याने नागरिक संतापले

गोव्यातील (Goa) शिवोलीत (Siolim) रस्ता खोदकामावरून संतापलेल्या स्थानिक रहिवाशांनी संबंधित जमीनमालक यांना पंचायत मंडळाच्या समोरच धारेवर धरले.
Siolim, Goa
Siolim, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: बामणवाडा- शिवोली (Siolim) येथे एका  स्थानिक जमीन मालकांकडून तेथील नवीन रहिवासी इमारतीच्या बांधकाम परिसरात जुना सार्वजनिक रस्ता खोदून जागेत अतिक्रमण (Encroachment) केल्याची रितसर तक्रार मार्ना शिवोली पंचायत कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान,  या प्रकरणाची तात्काळ दखल घेत मार्ना शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर यांनी आपल्या इतर पंच सदस्यांसहित घटना स्थळी भेट देत  तेथील जागेची पाहाणी केली.

रस्ता खोदकामावरून  संतापलेल्या  स्थानिक रहिवाशांनी  संबंधित जमीनमालक यांना पंचायत मंडळाच्या समोरच धारेवर धरले तसेच यावेळी  त्यांच्यात  जोरदार शाब्दिक चकमक उडाली, सुदैवाने प्रकरण हातघाईवर  येण्यापासून थोडक्यात बचावले.  दरम्यान, साल  2008 मध्ये  बामणवाडा शिवोलीतील सर्वै क्र: 50/16 या जागेतील रस्ता संबंधित जमीन मालकाच्या  मर्जीनुसार तसेच स्वखर्चाने शिफ्ट करण्याचा परवाना त्यांना स्थानिक पंचायतकडून  देण्यात आला होता. तथापि,  पंचायत कडून प्राप्त याच  परवान्याचा  आधार घेत संबंधीत जमीन मालकाने  आपल्या मालकीच्या जागेस लागून असलेला जुना रस्ता स्थानिक लोकांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीनुसार  खोदल्यानेच सदर प्रकरण चिखळल्याचे स्थांनिकांनी सांगितले.

Siolim, Goa
Goa: सोनसोड्यावरील सद्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय

दरम्यान,  बामवाडा -शिवोलीतील  खोदलेला रस्ता संबंधित जमीन मालकाकडून जो पर्यत  पुर्ववत केला जाणार नाही तोपर्यंत याभागातील  बांधकामास स्थानिकांचा जोरदार विरोध राहाणार असल्याचे स्थानिक रहिवासी कालीदास शिरोडकर यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com