CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 11 वर्षे बंद असलेल्या खाणी लवकरच सुरू करणार! कामगारांची सुरक्षा जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील

मुख्यमंत्री सावंत : साखळीत सेसाच्या 93 कामगारांचे अभिनंदन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant राज्यात गेली 11 वर्षे बंद असलेल्या खनिज खाणी लवकरच सुरू होतील, त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी साखळी येथे सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी तसेच खाणी सुरू करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल डिचोलीतील सेसा खाण कंपनीच्या 93 कामगारांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

डिचोलीतील सेसा खाण कंपनीत कामावर रूजू झालेल्या कामगारांच्या शिष्टमंडळाने साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही या कामगारांचे सरकारवर विश्वास ठेवून कंपनीत कामावर रुजू झाल्याबद्दल अभिनंदन केले. सावंत यांनी गोव्यातील खनिज खाण व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

गोव्यात येणाऱ्या काळात खाणी सुरू करून खाण अवलंबित व कामगारांची सुरक्षा जपण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने खाण लीजांचा लिलाव करून खाणी सुरू करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आम्ही अभिनंदन केले आहे, असे सिध्देश परब यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी कामगारांना पूर्ण पाठिंबा दर्शवला असून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही या कामगारांना पाठिंबा दिला आहे. डिचोली व राज्यातील बाजारपेठ व खाण व्यवसायाशी संबंधित व्यवसाय आता पुन्हा बहरणार आहे. त्यासाठी लोकांनीही खाण व्यवसायाला सहकार्य व पाठिंबा द्यावा, असे आवाहन परब यांनी केले.

सकारात्मक बाब!

खाणी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सरकारने कामगारांना सदैव पाठिंबा दिला आहे. सरकारच्या या प्रयत्नांवर विश्वास ठेवून सेसा खाण कामगारांनी कंपनीत कामावर रुजू झाले, ही सकारात्मक बाब आहे.

सरकार कामगारांच्या हितासाठीच कार्यरत आहे. आगामी काळात खाण व्यवसाय निश्‍चित सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT