Mine Block Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: राज्यातील खाणींबाबत सरकारची महत्वाची अपडेट, 'या' महिन्यात सुरू होईल खाण व्यवसाय

एस. शानभोग : डंप पॉलिसीचीही होणार लवकरच घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Mine Block Goa खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने जाहीर केलेल्या ई-लिलावातील यशस्वी बोलीधारकांकडून यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये राज्यातील खनिज व्यवसाय सुरू होईल, अशी माहिती खाण संचालक डॉ. एस. शानभोग यांनी दिली. लवकरच खाणींबाहेर टाकलेल्या डंप खनिजासंबंधीची पॉलिसी जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

डॉ. शानभोग म्हणाले की, खात्याच्या वतीने पहिल्या 4 खनिज ब्लॉक्सचा 13 सप्टेंबर 2022 रोजी लिलाव जाहीर केला आणि लिलाव प्रक्रिया पूर्ण करून 13 जानेवारी 2023 रोजी यशस्वी लिलावधारकांना संबंधित संमतीपत्रे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आली.

17 एप्रिल 23 रोजी दुसऱ्या 5 खनिज ब्लॉक्सचा लिलाव जाहीर केला होता. याचीही लिलाव प्रक्रियाही पूर्ण केली असून यशस्वी बोलीधारकांना संमतीपत्रे दिली आहेत.

यापैकी ब्लॉक १ डिचोली या वेदांता कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या खाणीची पर्यावरणीय जनसुनावणी पूर्ण झाली आहे.

त्यामुळे त्यांना लवकरच पर्यावरण दाखले मिळतील, अशी अपेक्षा आहे. हे दाखले मिळताच खनिज व्यवसाय सुरू होईल, तर इतरांचे पर्यावरणीय दाखले टप्प्या-टप्प्याने मिळतील, अशी अपेक्षा आहे.

30 दशलक्ष टन मर्यादा

न्यायालयाने 30 दशलक्ष टन खनिज उत्खननाची मर्यादा घातली आहे. सरकार सुरुवातीला सुमारे 40 खाण लीजांचा लिलाव करणार आहे. शिवाय अगोदर झालेल्या लिलावात घेतलेले, मात्र डंप करून ठेवलेले व हलवण्याची मुदत संपलेले खनिज ताब्यात घेतले आहे. त्या खनिजाची ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT