Goa Milet Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Milet Farming: राज्यात बाजरी लागवडीखालील क्षेत्रात दुप्पट वाढ; यंदा 50 हजार हेक्टरवर लागवड

सरकारकडुनही पाठबळ

Akshay Nirmale

Goa Milet Farming: एकेकाळी किफायतशीर परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांना कानाडोळा केलेल्या बाजरीच्या पिकाने पुन्हा सर्वाधिक मागणी असलेले पिक म्हणून स्थान प्राप्त करण्यास सुरवात केली आहे.

बाजरीला आता सुपरफूड म्हणून ओळखले जात असून राज्यातील बाजरीच्या लागवडीत दुप्पट वाढ झाली आहे. गतवर्षी राज्यातील 20,000 हेक्टर जमिनीवर बाजरीची लागवडी केली गेली होती आणि ती केवळ डोंगराळ भागांपुरती मर्यादित होती.

पण यंदा 2023 मध्ये राज्यात 50 हजार हेक्टर जमिनीवर बाजरीची लागवड करण्यात आली आहे. 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे. कृषी संचालनालयाने त्यांच्या विविध विभागीय कृषी अधिकार्‍यांमार्फत राज्यात या पिकाच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी प्रयत्न केले.

त्यामुळे सध्या अंदाजे 50,000 हेक्टर जमीन बाजरी लागवडीखाली आहे. सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात बाजरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रति हेक्टर 20,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

काणकोणसारख्या डोंगराळ भागात नाचणी आणि वरी अशा बाजरीच्या दोन प्रकारांचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जुलैपासून सासष्टी, बार्देश आणि तिसवाडी येथे शेतकऱ्यांनी बाजरीची लागवड सुरू केली आहे.

कापणीचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. बाजरीखालील क्षेत्र वाढल्याने, या वर्षी पिकाच्या एकूण वार्षिक उत्पादनातही चांगली वाढ अपेक्षित आहे. रब्बी हंगामात, बाजरी लागवडीखाली आणखी 40 ते 50 हेक्टर क्षेत्र येऊ शकते. बाजरीला हे रब्बी पीक आहे. त्याला जास्त सिंचनाची गरज नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT