Goa Crime: वेरे येथे सोनसाखळी चोरीप्रकरणी 'त्या' चोरट्याला अटक; पोलिसांनी जारी केले होते सीसीटीव्ही फुटेज

पर्वरी पोलिसांची कारवाई, 50 हजाराच्या सोनसाखळीसह दुचाकी जप्त
Porvorim Thief Arrested
Porvorim Thief ArrestedDainik Gomantak

Porvorim Thief Arrested: वेरे येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यास पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. 20 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आज, गुरूवारी सकाळी या संशयित चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते.

तसेच त्याच्याबाबत माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. गुरूवारी संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.

पर्वरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी सांगितले की, बार्देश तालुक्यातील वेरे येथील श्रीमती सुधा वेंगुर्लेकर (वय 65 वर्षे) यांनी याबाबत तक्रार दिली होती.

Porvorim Thief Arrested
Goa Crime: महिलेने पुलावरून मांडवी नदीत मारली उडी? पोलिसांकडून शोध सुरू...

20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती चालत त्यांच्याजवळ आली. त्याने त्यांच्या गळ्यातील 50,000 रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली आणि तो दुचाकीवरून पळून गेला. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी परिसरातील 50 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. त्यातून संशयिताची ओळख पटली. त्याचे नाव सागर महादेव गावडे (वय 31 वर्ष, रा. कुर्का, तिसवाडी- गोवा) असे आहे. त्याचा वेरे येथील नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. तिथेच त्याला अटक करण्यात आली आहे.

Porvorim Thief Arrested
Goa Monsoon 2023: गोव्यात पावसाने ओलांडली सरासरी; आत्तापर्यंत किती पाऊस पडला? जाणून घ्या...

त्याच्याकडून सोन्याची चेन आणि अॅक्टिव्हा दुचाकी GA 07 AE 9704 जप्त करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे इतरही प्रकरणात चौकशी केली जात आहे.

पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश करपे यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक राहुल परब, पोलिस उपनिरीक्षक सीताराम मलिक, कॉन्स्टेबल नितेश गावडे, आनंद कंदुरगी, योगेश शिंदे, महादेव नाईक आणि उत्कर्ष देसाई यांच्या पथकाने तपास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com