Goa Dairy Milk Gomantak Digital Team
गोवा

Goa Dairy Milk : गोवा डेअरीची स्‍थिती ‘संजीवनी’सारखी!

दूधदुभत्यामुळे संसाराचा गाडा हाकताना या दूधउत्पादकांनी गोवा डेअरी हीच आपली पोशिंदी आई आहे, असे मानले.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील एकमेव दूधउत्पादकांच्या गोवा डेअरीला 50 वर्षे पूर्ण झाली. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा डेअरीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर गोवा डेअरीचा प्रगतीचा वारू सुसाट उधळला. वास्तविक 50 वर्षे पूर्ण केलेल्या गोवा डेअरीची स्थिती आज काय असायला हवी होती, हे वेगळे सांगायची गरज नाही.

पण दूधउत्पादक वाढ खुंटली, युवावर्ग शेणामुतात हात घालायला राजी होईना, आहे तेच दूध उत्पादक गोवा डेअरीला दूध पुरवत राहिले, त्यामुळे डेअरीत दुधाचा राबता वाढला नाही, किंबहुना आहे त्यात तो कमीच होत गेला आणि आज या स्थितीवर गोवा डेअरी पोचली आहे. सुरूवातीच्या काळात गोवा डेअरी ही राज्यातील सर्वात मोठी दूध डेअरी ठरली आणि गोमंतकीयांच्या सकाळी आणि संध्याकाळच्या चहात गोवा डेअरीचे दूध दिसू लागले.

गोमंतकीयांचा सार्थ विश्‍वास गोवा डेअरीने जिंकला खरा, पण त्यात सातत्य राखण्यात डेअरीला अपयशच आले. कारणे अनेक आहेत, त्यात गोवा डेअरी हे चरण्‍याचे कुरण ठरले. त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्र्याने गोवा डेअरीवर केलेली खोगीरभरती आणि आपल्याच मतदारांची नोकरीसाठी लावलेली वर्णी हे कारणही पुरेसे आहे.

गोवा डेअरीने दूध विक्रीपुरते काम मर्यादित ठेवले नाही, तर दुधापासून दुग्धजन्य अनेक पदार्थ बाजारात आणले. पण त्यात सातत्य राहिले नाही. आज गोवा डेअरीची स्थिती काय आहे, हे कुणाला विचारण्याची गरज नाही. डबघाईला आलेल्या गोवा डेअरीला मजबूत हात आणि समर्थ साथ देण्याची खरी गरज आहे. दूध उत्पादकांबरोबरच राज्य सरकारने डेअरी नफ्यात आणण्यासाठी एकमेकांच्या हातात हात मिसळले तर ते शक्य आहे, असे ज्येष्ठ दूध उत्पादकांना वाटते.

गोवा डेअरीच्या माध्यमातून गोव्यातील अनेक दूध उत्पादकांनी आपले संसार चालवले. दूधदुभत्यामुळे संसाराचा गाडा हाकताना या दूधउत्पादकांनी गोवा डेअरी हीच आपली पोशिंदी आई आहे, असे मानले. पण नंतरच्या काळात सुमूलचे गोव्यात पदार्पण आणि काही दूधउत्पादकांचा सुमूलकडे वळलेला कल, यामुळे गोवा डेअरीच्या दुधात कपात झाली. पूर्वीच्या सारखे दूध उपलब्ध होईना. त्यातूनच मग बाहेरील दुधावर विसंबून रहावे लागल्यामुळे गोवा डेअरीचा गाडा हाकताना तत्कालीन संचालक मंडळाला तारेवरची कसरत करावी लागली. पुढे जे काही घडले ते सर्वांना ठाऊक आहे.

म्हारवासडा-उसगाव येथील गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्पही नंतरच्या काळात नुकसानीत गेला. केवळ दूध विक्रीवरच गोवा डेअरीची भिस्त राहिली. त्यामुळे नुकसानीत वाढ होतच राहिली. मात्र नियोजनाचा फज्जा उडाल्यामुळे नंतरच्या आणि अलीकडच्या काळातही गोवा डेअरीचा डोलारा सावरणे फारच कठीण बनले. त्यातच गोवा डेअरीवर सातत्याने सरकारनियुक्त प्रशासकीय समिती आणि संचालक मंडळाची गोची यामुळेही डेअरीचा तोल ढासळला.

कधी नव्हे ते तीन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पाच प्रशासक गोवा डेअरीने पाहिले. पण गोवा डेअरीची स्थिती काही सुधारू शकली नाही. संचालक मंडळाच्या काळातील कथित घोटाळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेला गैरव्यवहार पाहता, गोवा डेअरी तरारून वर येण्याऐवजी रसातळाला पोचण्यात मदतच झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT