Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: पाण्यासाठी कर्नाटकची घिसाडघाई तर म्हादई प्रश्‍नी आमचाच विजय, शिरोडकरांचा पुनरुच्चार

शिष्टमंडळ जाणार दिल्लीला : परवान्यासाठी सिद्धरामय्या यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादई नदीच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकचे शेजारील बहुतांश राज्यांशी भांडण सुरू आहे. गोव्याचाही वाद सर्वोच्च न्यायालयात आणि जललवादाकडे असताना या प्रश्नाकरता कर्नाटकातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (बुधवारी) बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत दिली.

सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटक विधानभवनात विविध राज्यांशी असलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.सिद्धरामय्या म्हणाले, सरकारला कणकुंबी येथे म्हादई नदीवर कळसा-भांडुरा प्रकल्प तातडीने सुरू करायचा आहे.

यासाठी यापूर्वीच केंद्रीय जल आयोगाने डीपीआरला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून नव्याने निर्माण होत असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे यात अडथळे येत आहेत.

म्हादई व कावेरीवरील योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेले जाईल. तेथे पंतप्रधान, वन आणि पर्यावरणमंत्री, जलस्रोत मंत्री यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात सूचना करण्याची विनंती केली जाईल.

- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक.

म्हादईच्या पाण्यासाठी कोण काय करते, याबद्दल मला जास्त बोलायचे नाही किंवा प्रतिक्रियाही द्यायची नाही.

आम्ही केवळ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची वाट पाहात आहोत. गोवा सरकारला निश्‍चित खात्री आहे, की म्हादई पाणी वाटपप्रश्‍नामध्ये आमचाच विजय होईल.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT