Banastarim Bridge Accident: दोन कोटी रुपये जमा करा! खंडपीठाचा मेघनाला दणका

मृत व जखमी झालेल्यांच्या वारसांची आणि त्यांच्या बँक खात्याचीही माहिती न्यायालयाकडे सादर करा- खंडपीठाचे निर्देश
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघातप्रकरणी मर्सिडीस कारची मालक मेघना सावर्डेकर हिने पोलिस समन्सला आव्हान दिलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच इस्पितळात उपचार घेणाऱ्या जखमींना उपचारासाठी स्वेच्छेने मदत करण्याचे मान्य केल्याने गोवा खंडपीठाने तिला २ कोटी रुपये ६ सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले.

या रकमेतील दोन मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, तर जखमींच्या तीन कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपये द्यावेत, तर उर्वरित २५ लाख रुपये न्यायालयात जमा राहतील, असे आदेशात नमूद करून न्यायालयाने सुनावणी ६ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

६ ऑगस्टला झालेल्या या अपघातात दुचाकीवरील सुरेश आणि भावना फडते हे दाम्पत्य तर अन्य एका दुचाकीवरील अरूप करमाकर यांचा मृत्यू झाला होता, तर वनिता भंडारी, शंकर हळर्णकर आणि राज माजगावकर हे गंभीर जखमी झाले होते.

यातील शंकर हळर्णकर यांच्यावर गोमेकॉत चारवेळा शस्त्रक्रिया करूनही त्यांची प्रकृती गंभीरच आहे. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अर्जदार मेघना सावर्डेकर हिला म्हार्दोळ पोलिसांनी तीनवेळा समन्स बजावले होते. आता हा तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला आहे. तिची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कलम १६४ खाली जबानी नोंद झाली असून वैद्यकीय तपासणीही केली आहे.

त्यामुळे हे समन्स कालबाह्य ठरत आहेत. क्राईम ब्रँच या समन्सची कार्यवाही करणार नाही. या अपघातात निष्पाप तिघांचा बळी गेला.

Banastarim Bridge Accident
Birsa Munda Statue at Goa: परशुरामानंतर आता राज्यात उभारणार बिरसा मुंडा यांचा पुतळा- सावंत

तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. अरूप करमाकर हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्याच्या मागे आई-वडील आणि एक भाऊ आहे. फडते दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

जखमींवर गोमेकॉत मोफत उपचार सुरू असले तरी या कुटुंबीयांना उपचारावरील खर्च परवडणारा नाही, अशी माहिती सरकारी वकील शैलेंद्र भोबे यांनी न्यायालयात दिली. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने त्या कुटुंबांना मेघनाने मदत देण्याची दाखवलेली तयारी मान्य केली.

Banastarim Bridge Accident
President droupadi Murmu Goa: विधानसभेत महिलांच्या सहभागाबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता, नेत्यांचेही कान टोचले

खंडपीठाचे निर्देश

सरकारी वकिलांनी अपघातातील मृत व जखमी झालेल्यांच्या वारसांची आणि त्यांच्या बँक खात्याचीही माहिती न्यायालयाकडे सादर करावी. तसेच मदतीची रक्कम न्यायालयात जमा झाल्यावर तिची विभागणी करून संबंधितांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाईल, अशी व्यवस्था करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Excise Department liquor Seizure
 Madhya Pradesh Tourism 2025
EPFO how to check PF interest credit and account balance online
Moushumi Chatterjee Goa Event
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com