पणजी: अहमदाबाद येथे झालेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) राष्ट्रीय परिषदेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. आयएमए मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क (आयएमए एमएसएन) २०२५ च्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये गोमेकॉने तब्बल चार पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून अशी कामगिरी करणारे हे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानूशाली, माजी अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन, सरचिटणीस डॉ. सरबारी दत्ता आणि वित्त सचिव डॉ. पीयुष जैन यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या ऐतिहासिक कामगिरीत वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही श्रेणींमध्ये गोव्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. पार्थ शिंदे याला ‘आयएमए एमएसएन नॅशनल चेअरमन एप्रिसिएशन अवॉर्ड २०२५’, दिव्या गावडे हिला 'आयएमए एमएसएन नॅशनल सेक्रेटरी एप्रिसिएशन अवॉर्ड २०२५’,
सूर्यम सिंग याला ‘आयएमए एमएसएन नॅशनल लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ आणि आयएमए एमएसएन गोवा संघ: संपूर्ण टीमला त्यांच्या सामूहिक प्रयत्नांसाठी ‘आयएमए एमएसएन कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोमेकॉ एमएसएन सल्लागार डॉ. जगदीश काकोडकर यांनी सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हा ऐतिहासिक विजय आमच्या विद्यार्थ्यांमधील प्रतिभा, समर्पण आणि नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. त्यांचा मार्गदर्शक म्हणून मला या यशाचा अत्यंत आनंद होत असून, ‘गोमेकॉ’चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.