Goa ST Reservation Dainik Gomantak
गोवा

GMC Reservation: महत्वाची बातमी! वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात OBC आरक्षण लागू; आरोग्य खात्याकडून आदेश जारी

Medical education reservation in Goa: गोवा विद्यापीठाच्या अधिनियमांत आवश्यक दुरुस्ती करून २०२४ मधील प्रवेश नियमांत बदल करण्याबाबतचा मसुदा देखील सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अभ्यासक्रमांच्या जागांचे वाटप आणि आरक्षण लागू करण्यासंदर्भात आरोग्य खात्याने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

आरोग्य विभागाचे अवर सचिव सीताराम सावळ यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यास पत्र पाठवून १०० गुण क्रमवारी पद्धतीनुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासोबतच गोवा विद्यापीठाच्या अधिनियमांत आवश्यक दुरुस्ती करून २०२४ मधील प्रवेश नियमांत बदल करण्याबाबतचा मसुदा देखील सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

ओबीसी महासंघाकडून स्वागत

सरकारच्या या निर्णयाचे ओबीसी महासंघाने स्वागत केले असून, भविष्यात आरक्षणाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या निर्णयासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. २००७ पासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने आता महत्त्वाचे पाऊल उचलले असून, ओबीसीसह सर्वच वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे महासंघाचे राज्य अध्यक्ष मधू नाईक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT