GMC Bambolim subway sewage problem Dainik Gomantak
गोवा

बांबोळीतील गोमेकॉसमोरील भुयारी मार्ग 'आजारी'! सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी; वाहनचालक, पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप

GMC Bambolim subway sewage problem: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या महामार्गावरील भुयारी मार्ग सध्या समस्यांचे माहेरघर बनला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या महामार्गावरील भुयारी मार्ग सध्या समस्यांचे माहेरघर बनला आहे. गोमेकॉत येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी या मार्गाचा वापर करतात. परंतु सध्या हा भुयारी मार्ग सांडपाण्याने भरला आहे. येथून प्रवास करणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे झाले आहे.

या भुयारी मार्गावर येतातच चिखल आणि सांडपाण्याचा दुर्गंध नाकाला झोंबतो. येथील गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर तुंबून आहे. पाणी तुंबून असल्याने हे विविध आजारांना दिलेले खुले आमंत्रणच आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो लोक ये-जा करतात. या समस्येकडे आमदार विरेश बोरकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कचरा कारण...

या भुयारी मार्ग सांडपाण्याने तुंबण्यास कचरा कारण आहे. रस्त्यावरही कचरा दिसून येतो. हा कचरा येतो कुठून याचा शोध घेणे आवश्यक आहे. आसपासचे कुणी व्यावसायिक तर येथे कचरा आणून टाकत नसावेत ना, याचा शोध घ्यायला हवा. तसेच या परिसरात साचलेला कचरा वेळीच उचलायला हवा. कुडका बांबोळी पंचायतीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT