Mayem kalotsav Dainik Gomantak
गोवा

Mayem kalotsav : पोलिस बंदोबस्तात कळसोत्सवाला प्रारंभ; मयेत तणाव

आजपासून घरोघरी भक्तांच्या भेटीसाठी कळसाचे आगमन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mayem kalotsav : समस्त भाविकांना उत्कंठा लागून राहिलेल्या मये येथील श्री महामाया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला अखेर पोलिस बंदोबस्तात आजपासूून (ता.24) प्रारंभ झाला.

मान आणि अधिकाराच्या मुद्द्यावरुन श्री महामाया आणि श्री केळबाय या दोन्ही देवस्थान ठिकाणी गोंधळ आणि वातावरण काहीसे तणावग्रस्त बनले. मामलेदार राजाराम परब यांनी न्यायालयाच्या निवाड्याचा हवाला देत विरोधी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी गट आपल्या दाव्याशी ठाम राहिले.

पोलिस बंदोबस्तात गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरातून सायंकाळी कळस बाहेर काढण्यात आला आला. उद्या शनिवारपासून आठ दिवस भक्तांच्या भेटीसाठी कळसाचे घरोघरी आगमन होणार आहे.

शनिवारी (ता.4 मार्च) रोजी रात्री कळसाचे पुनःश्च श्री महामाया मंदिरात आगमन होणार आहे. त्याठिकाणी कौलोत्सव होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून वादात अडकलेला कळसोत्सव यंदा निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याकडे तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही कळस मंदिरातून बाहेर काढण्यात आला.

सायंकाळी कळस मंदिराबाहेर काढून मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. पारंपरिक गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसारी मोडासह वाजतगाजत देवीचा कळस श्री केळबाय मंदिरात नेण्यात आला. त्याठिकाणी कौल विधी पार पाडल्यानंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन झाले.

वादाची पार्श्वभूमी

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव गेल्या काही वर्षांपासून वादात अडकला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून 2019 साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकाकडून निलंबीत करण्यात आले होते.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून 2020 साली शेवटच्या क्षणी कळसोत्सव निलंबित करण्यात आला होता. मात्र नंतर उच्च न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्री.

गेल्या दोन वर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

Baina Theft: मध्यरात्री 7 दरोडेखोर घुसले, कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; कपाट फोडून रोकड-दागिने लंपास; वाचा घटनाक्रम..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता, पैशांचे नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस; 'या' राशीसाठी आजच दिवस फायद्याचा!

Money Laundering Case: 'अल फलाह युनिव्हर्सिटी'च्या संस्थापकाला ठोकल्या बेड्या, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; लाखोंच्या कॅशसह दस्तऐवज जप्त

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

SCROLL FOR NEXT