Biodiversity Of Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem Biodiversity: मये उलगडणार 1,300 वर्षांचा जैवविविधतेचा इतिहास; त्रिवेणी वारसा सांगणारं देशातील पहिलंच गाव

डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या नकाशाचे आणि वेबसाईटचे अनावरण करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Biodiversity Of Mayem: मये गावातील समग्र इतिहास दर्शविणारा ‘जैवविविधता नकाशा’ तयार करण्यात आला असून या नकाशाचे येत्या बुधवारी (ता. १६) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.

मये-वायांगिणी पंचायतीच्या सहकार्याने मये जैवविविधता व्यवस्थापन आणि पाणलोट संघातर्फे हा नकाशा तयार करण्यात आला आहे. अशाप्रकारचा नकाशा तयार करणारे मये हे देशातील पहिले गाव ठरले आहे.

तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सहकार्याने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मये जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि पाणलोट संघाचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी (ता. १२) सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी मये-वायंगिणीच्या सरपंच सौ. सुवर्णा चोडणकर, उपसरपंच सुफला चोपडेकर, पंच सदस्य वर्षा गडेकर, विद्याधर कारबोटकर तसेच गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत तारी उपस्थित होते.

Press Conference

तेराव्या शतकापासूनचा इतिहास

इसवी सन तेराशेपासूनचा मये गावचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी वारसा याबद्दल माहिती संकलित करून ती या नकाशात समाविष्ट करण्यात आली आहे. या नकाशात जैवविविधता संपत्तीचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाबाबतीत संशोधनाचे काम सुरू होते अशी माहिती सखाराम पेडणेकर यांनी देऊन हा प्रकल्प आताच्या आणि भावी पिढीसाठी उपयुक्त आणि वरदान ठरणार आहे, अशी आशा व्यक्त केली.

महामाया देवस्थानात नकाशाचे अनावरण

बुधवारी सकाळी 10 वाजता गावकरवाडा-मये येथील श्री महामाया देवस्थान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या नकाशाचे आणि वेबसाईटचे अनावरण करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. अन्य मान्यवरांत गोवा राज्य जैवविविधता व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, देवस्थानचे अध्यक्ष रमेश परब, सरपंच सुवर्णा चोडणकर उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ..हेच खरे गोमंतकीय! 75 वर्षांचे आजोबा बघताबघता चढताहेत झाडावर; गोव्याचे 'बाप्पा' होताहेत सोशल मीडियावर हिट

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Crime News: इव्हेंटच्या कामासाठी बोलावलं अन् वासनेची शिकार बनवलं! मुंबईच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राजस्थान पुन्हा हादरलं

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

SCROLL FOR NEXT