Sharath, Sathiyan Dainik Gomantak
गोवा

'WTT Star Contender Table tennis साठी भारतीयांत शरथ, साथियन प्रमुख खेळाडू

'WTT Star Contender Table Tennis Goa': स्पर्धेला २३ जानेवारीपासून सुरवात

किशोर पेटकर

'WTT Star Contender Table Tennis Goa': प्रमुख भारतीय टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, साथियन ज्ञानशेखरन यांच्यासह ३५ भारतीय खेळाडू ‘डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर गोवा’ स्पर्धेच्या एकेरीतील पात्रता फेरीत खेळतील. जागतिक खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा म्हापसा येथील पेडे क्रीडा संकुलात २३ ते २८ जानेवारी या कालावधीत खेळली जाईल.

डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धा सलग दुसऱ्यांदा गोव्यात खेळली होत आहे. देशातील ही सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा स्तुपा स्पोर्टस ॲनालिटिक्स व अल्टिमेट टेबल टेनिस यांच्यातर्फे भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.

जागतिक क्रमवारीत वरच्या मानांकनावर असलेली महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, हरमीत देसाई यांच्यासह नऊ भारतीय खेळाडू थेट मुख्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीत ३२ भारतीय खेळतील.

त्यामुळे स्पर्धेतील एकूण भारतीय खेळाडू संख्या ४१ असेल, गतवर्षी स्पर्धेच्या पहिल्या वर्षी देशातील ४० टेबल टेनिसपटू खेळले होते. शरथ, साथियन, अहयिका मुखर्जी, सुतिर्था मुखर्जी, सनील शेट्टी या अनुभवी खेळाडूंसह सध्याची राष्ट्रीय विजेती पॉयमांती बैस्य, पायस जैन, एस. फिडेल, आर. स्नेहित, मुदित दाणी, जीत चंद्रा, दिया चितळे, यशस्विनी घोरपडे, अर्चना कामत, स्वास्तिका घोष, सुहाना सैनी यांचाही सहभाग पात्रता फेरीत असेल.

जागतिक पातळीवरील २०२३ मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुहेरीतील ब्राँझपदकप्राप्त चो देई-सेओंग, १७ वर्षीय ओह जुनसुंग हे कोरियन, हंगेरियन बेन्स मेजरस हे खेळाडू एकेरीच्या पात्रता फेरीत खेळतील.

जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकावरील ह्युगो काल्देरानो हा स्पर्धेतील उच्च मानांकित टेबल टेनिसपटू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT