Rise In Vegetable Price  Dainik Gomantak
गोवा

Rise In Vegetable Price: पालेभाज्या कडाडल्या! टोमॅटो दर ‘जैसे थे’

कांदा, बटाटा स्थिर ः मध्यमवर्गीयांचे कोलमडले बजेट

गोमन्तक डिजिटल टीम

Rise In Vegetable Price: महिनाभरापासून टोमॅटोचे दर कडाडले आहे., सर्वच भाजीचे दर वाढलेले आहेत. फक्त कांदा आणि बटाट्याचा दर स्थिर आहे. टोमॅटो १४० ते १६० रुपये प्रती किलो दराने विकला जात असल्याने मध्यमवर्गीयांच्या आहारातून टोमॅटो गायबच झाला आहे.

पालेभाज्याचे दर देखील कडाडल्याने मध्यमवर्गीयांना तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्‍न पडला आहे.

पन्नास रूपयांना पालेभाजीच्या दोन जुड्या विकल्या जात आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीयांचे खिसे रिकामे होत आहेत.

येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण श्रावण महिन्यात बहुतांशी गोमंतकीय केवळ शाकाहाराचे सेवन करतात, त्यामुळे पुढील महिन्यात भाजीला मागणी वाढणार असून जर पुरवठ्यात तूट जाणवल्यास दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. पणजी मार्केटमध्ये गावठी भाजी, भाजीची केळी, नीरफणस आदींना देखील चांगली मागणी आहे.

रानभाज्या बाजारात दाखल

पणजी मार्केटमध्ये टायखिळा, कुडूक, फांगला, कोंब, नीर फणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत असून त्यांना चांगली मागणी आहे.

ग्रामीण भागात रान भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजीचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम झालेला नाही. सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

बाजार भाव (प्रतिकिलो रु.)

टोमॅटो : १४०-१६०

कांदा : ३०

बटाटा : ४०

कारली : ८०

भेंडी : ६०

कोबी : ४०

फ्लॉवर : ४०

फलोत्पादन (प्रतिकिलो रु.)

भेंडी ५०

कोबी ३०

गाजर ३८

फ्लॉवर ३५

हिरवी मिरची ६५

कांदा २५

बटाटे २७

टोमॅटो ११२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT