Jayesh Chodankar Case: संशयित आरोपी प्रितेश, कृपेशचा जामीन अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळला; नव्याने अर्ज करण्याची मुभा

दोघांनाही आरोपपत्र दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयासमोर नव्याने जामीन याचिका दाखल करण्यासाठी मुभा
Jayesh Chodankar Murder Case
Jayesh Chodankar Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Jayesh Chodankar Murder Case: चिंबल येथील जयेश चोडणकर खून प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली होती. या घटनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

संशयित आरोपी प्रितेश अडकोणकर व कृपेश वळवईकर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज फेटाळला आहे.

Jayesh Chodankar Murder Case
Banastarim Bridge Accident Case: मर्सिडीज चालक परेश सावर्डेकरचा पोलिस रिमांड आणखी पाच दिवसांनी वाढवला

नव्याने जामीन याचिका

खंडपीठाने हा गंभीर गुन्हा असल्याचे नमूद केले आणि अर्ज नाकारल्यानंतर संशयित आरोपी प्रितेश आणि कृपेश यांनी उच्च न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला. उच्च न्यायालयाने या दोघांनाही आरोपपत्र दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयासमोर नव्याने जामीन याचिका दाखल करण्यासाठी मुभा दिली आहे.

अशी केली जयेशची हत्या

जयेश चोडणकर याला संशयितांनी बोलावून चिंबल येथील वाहन पार्किंगसंदर्भातच्या जागेवर तोडगा काढू, असे सांगितले होते. जयेश हा त्यांना भेटण्यास आला असता प्रीतेश अडकोणकर व कृपेश वळवईकर या दोघांनी त्याच्या डोक्यावर तसेच शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केली.

तो बेशुद्ध पडल्यावर त्याला चिंबल येथून मेरशी जंक्शनवर आणून टाकण्यात आले. त्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाल्याचे दाखवण्याचा संशयितानी प्रयत्न केला. मात्र हा सर्व प्रकार पाहणारे साक्षीदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com