Goa News | karnatak  Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हादई खोऱ्यात कालव्‍यासाठी चोरपावलांनी मार्किंग

Goa News: कर्नाटक सरकारचे नवे कारस्‍थान : भविष्‍यात उत्तर गोव्‍यातही पाणी टंचाईची भीती

दैनिक गोमन्तक

Goa News: महत्त्वाकांक्षी कळसा-भांडुरा धरण प्रकल्प पूर्ण करून गोव्याच्या तोंडचे म्हादईचे पाणी पळविण्यासाठी कर्नाटकने चोरपावलाने कारस्थाने सुरूच ठेवली आहेत. हे धरण उभारण्यासाठी हलतरा आणि कळसा भागात माती परीक्षण करण्याबरोबरच प्रस्तावित कालवा खोदण्यासाठी मार्किंगही जवळपास पूर्ण केले आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांच्यासह आज या ठिकाणांना भेट देऊन कर्नाटकच्या या कारस्थानांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी सरदेसाई यांनी म्हादई खोऱ्यात कर्नाटकने केलेल्या नव्या प्रकल्पांवरही केरकर यांच्याशी चर्चा केली तसेच गोव्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले. या दोघांनी चोर्ला येथील म्हादई खोऱ्याच्या प्रस्तावित हलतरा धरणाच्या भागाला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई हेही उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कर्नाटकच्या हालचालींचा मागोवा घेतला. यावेळी सरदेसाई म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास भविष्यात गोव्यात बार्देश तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील वाळवंटी नदी कोरडी पडेल. निदान त्यामुळे तरी मुख्यमंत्र्यांनी हालचाल करून कर्नाटकची ही कारस्थाने जललवादासमोर मांडावीत.

"धरण बांधण्यासाठी हलतरा व कळसा या दोन्ही जागा किती योग्य आहेत हे कर्नाटक सरकार पाणी तंटा लवादासमोर सिद्ध करू पाहात आहे. त्यांनी कालव्यासाठी मार्किंगही पूर्ण केले आहे. गोव्याने आताच हालचाली केल्या नाहीत तर नंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल."

- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी.

"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फक्त म्हादई ही आपली आई, असे म्हणत आहेत. मात्र, आईचे रक्षण करण्यासाठी काहीच पावले उचलत नाहीत. आम्ही आता कर्नाटक सरकार काय करते, ते पुराव्यानिशी त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. आता तरी सरकारचे डोळे उघडावेत."

- विजय सरदेसाई, आमदार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT