Margao Garbage Problem | Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: अपघात रोखण्यासाठी ‘पसरीचा’चा आधार, मडगावनंतर आता इतर अपघातग्रस्त भागात होणार अंमलबजावणी

आमदार दिगंबर कामत यांनी केली मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आता डॉ. पी.एस. पसरीचा या पोलिस अधिकाऱ्याच्या अहवालाचा आधार घेतला जाणार आहे. गेली काही वर्षे हा अहवाल सरकारच्या विस्मृतीत गेला होता.

आमदार दिगंबर कामत यांनी डॉ. पसरीचा यांच्या अहवालातील काही गोष्टींची मडगावात अंमलबजावणी केल्यानंतर मडगावातील वाहतूक कोंडी काहीअंशी दूर झाली आहे, याकडे विधानसभेत लक्ष वेधत त्यांच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

कामत यांनी फोंडा, पेडणे, डिचोली, मायणा-कुडतरी आणि वेर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक जीवघेणे अपघात होत असल्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, दंडात्मक कारवाई झाली ही नंतरची बाब; आधी अपघात घडू नये यासाठी सरकार कोणती उपाययोजना करणार आहे ते सांगावे.

स्व. गुरुनाथ केळेकर ‘मार्ग’ ही संस्था चालवत. ते नियमितपणे शाळा, महाविद्यालयात जात आणि वाहतूक नियम व रस्ते सुरक्षिततेविषयी विद्यार्थ्यांत जागृती करत. त्या धर्तीवर सरकार काही करणार आहे का? त्यांनीच डॉ. पसरीचा यांना गोव्यात पाचारण केले होते.

त्यांनी तीन दिवस अभ्यास करून काही शिफारशी असलेला अहवाल सादर केला होता. तो अहवाल पाहून त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणे अपघातसंख्या घटण्यास मदत होईल. आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी खराब रस्ते अपघाताला कारण ठरत असल्याचा मुद्दा मांडला. खराब रस्ते हेही अपघाताला कारण आहे. अशा कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

मद्यपींचे अड्डे शोधा !

आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले, अनेक ठिकाणी युवक रात्रीच्या वेळी मद्यपान करतात. असे काही अड्डे आहेत ज्यांची माहिती पोलिसांनी मिळवावी. त्यातील बरेचजण हे रात्रीच्या मेजवान्यांच्या ठिकाणी काम करतात. तेथून लांबवलेल्या मद्याचे घोट ते घेत असतात. अशा ठिकाणी पाळत ठेवली तर अपघातांची संख्या घटण्यास मदत होईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाहतूक नियंत्रणासाठी केला गेला आहे. वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. याशिवाय अल्पवयीनांच्या हाती वाहन देणे टाळले पाहिजे. ४ हजार १७५ वाहन चालक परवाने रद्द केले आहेत. वाहतूक नियमभंगाचे ४ लाख ८ हजार २०६ गुन्हे नोंदवले आहेत. यंदा १८९ अपघात झाले असून त्यातील ८५ स्वयंअपघात आहेत.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT