Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Margao Traffic Issue: मडगावातील वाहतूक कोंडी काही सुटेना; ‘नो पार्किंग झोन’ मध्येच वाहनांचे पार्किंग

रहिवाशी त्रस्त: वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे समस्येत वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Traffic Issue: मडगाव मधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे समस्येत वाढ होत आहे. जिथे ‘नो पार्किंग झोन’ आहे, तिथेही वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जातात.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. आज नगरपालिका इमारतीसमोर एका व्यक्तीने पार्क केलेल्या वाहनामुळे दहा मिनिटांतच वाहनांची प्रचंड गर्दी झाली.

वाहन चालकांना वाहतूक पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे लोक आपल्याला पाहिजे तिथे व पाहिजे तशी वाहने पार्क करून जातात, असे नगरसेवक महेश आमोणकर यांनी सांगितले.

पोलिस केवळ जे दुचाकीवाले हेल्मेट वापरत नाहीत, त्यांना ‘तालांव’ देण्यावरच जास्त भर देत आहेत. वाहतूक सुरळीत करणे हे वाहतूक पोलिसांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. मात्र त्याकामी कमी पडतात, असेही आमोणकर म्हणाले.

नागरिकांनी सुद्धा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये,यादृष्टीने जबाबदारीने वागले पाहिजे. पालिका इमारतीसमोरची जागा ही वाहने पार्क करण्याची जागा नव्हे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक दंडात्मक कारवाई केली पाहिजे.

- मोदर शिरोडकर, नगराध्यक्ष मडगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT